बेळगाव छावणी सीमा परिषदेच्या अखतीयारीत येणाऱ्या किल्ला परिसरातील पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व वाहिन्या बदलण्यात येणार आहेत. अत्यंत जुनी असलेली पाईपलाईन बदलली जाणार आहे.
शुक्रवारी मराठा सेंटरचे ब्रेगेडियर आणि कॅटोंमेंट अध्यक्ष गोविंद कलवड यांनी किल्ला येथे पूजन करून या कामाचे भूमिपूजन केलं. किल्ल्यातील जुनी पाईप लाईन बदलून नवीन घालण्यासाठी 60 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती कॅटोंमेंट सी इ ओ दिव्या शिवराम यांनी दिली. यावेळी छावणी सीमा परिषदेचे सदस्या निरंजना अष्टेकर,साजिद शेख,मदन डोंगरे, माजी महापौर विजय मोरे,कॅन्टोमेंट माजी सदस्य प्रदीप अष्टेकर आदी उपस्थित होते.
दुर्गा मंदिरा परिसरात रहदारीला अडथळा नको-गोविंद कलवड
किल्ल्यातील दुर्गादेवी मंदिरात परिसरात रहदारीला अडथळा नको कायद्याच्या चौकटीत बसवून पूजेचे साहित्य विक्रेता महिलांना दुकानासाठी जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन ब्रेगेडियर गोविंद कलवड यांनी दिल आहे.
दुर्गादेवी मंदिर परिसराची पहाणी केल्यावर सदस्या निरंजना अष्टेकर यांनी कलवड आणि दिव्या शिवराम यांना फुल विक्रेत्या महिलांच्या समस्यांची माहिती दिली.त्यावेळी कलवड यांनी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या महिलांना बैठकीत चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले.