बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या आणि वाहतूक करणार्यांवर आता ग्राम विकास अधिकारी यांची नजर असणार आहे. यासाठी विशेष एप देण्यात आला आहे. यामुळे ज्या ग्राम पंचायत हद्दीत बेकायदा वाळू वाहतूक होत असल्यास त्याची माहिती आता पीडिओना मिळणार आहे.
नुकतीच बाल गंधर्व कला मंदिर येथे ग्राम विकास अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी या एप ची माहिती देण्यात आली आहे. यामुळे मात्र वाळू वाहतूक करणाऱ्याची चांगलीच पंचायत होणार आहे. ज्या ग्राम पंचायत मध्ये ही वाहतूक केली जाणार आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवायचा असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.
मध्यंतरी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू वाहतूक करण्यात येत होती. या वाळू वाहतुकीमध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारीही शामिल आहेत. महिन्याला भली मोठी रकम घेऊन रात्रीच्या वेळी ही वाहतूक करण्याचा ठरावही झाला असताना आता पीडिओ यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने कारवाई होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे
ग्राम पंचायत विकास अधिकारी यांना दिलेल्या एप मध्ये विशेष सॉफ्टवेअर घालण्यात आले आहे. या एप मुळे कोणत्या वाहनातून ही बेकायदेशीर वाळू नेण्यात येत आहे आणि कोणत्या ठिकाणी उतरविण्यात येणार आहे. याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील वाळू वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध बसण्याची शक्यता आहे. या बैठकीला विविध तालुक्यातील पीडिओ उपस्थित होते.