महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक नोव्हेंबर काळ दिन पाळून सायकल फेरी काढण्यात येणार सायकल फेरीसाठी पोलिसांकडे रीतसर अर्ज करून सायकल फेरीला परवानगी देण्याची मागणी केली आहे गेल्या 62 वर्षा पासून बेळगाव सह सीमा भागात कर्नाटक राज्योतसव दिनी काळा दिन पाळून आपल्या वर झालेल्या अन्यायाचा आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात येतो अव्याहत पणे गेल्या 62वर्षा पासून काळ बदलला तरी नेते बदलले तरी काळा दिन पाळण्याची परंपरा अखंड सुरू आहे त्यानुसार यावर्षीही एकीकरण समितीने काळा दिन पाळून भव्य सायकल फेरी काढण्याचे निश्चित केले आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा या टेबलावर सायकल फेरी बाबत करण्यात आलेला अर्ज विचाराधीन आहे आयुक्त राजप्पा यांनी सोमवारी सायकल फेरी ज्या भागातुन काढण्यात येणार आहे त्या भागातील पोलीस अधिकाऱ्याना घेऊन सायकल फेरीच्या मार्गाची पहाणी केली.पहाणीच्या दरम्यान सायकल फेरीच्या मार्गात जे काय अडथळे येऊ शकतात काय?वाहतुकीवर काय परिणाम होईल काय या संबंधीही राजप्पा यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
बुधवारी सायंकाळी पोलीस प्रशासन मागील वर्षी प्रमाणेच अटी घालून परवानगी मिळणार आहे. पोलिसांनी पहाणी केलेल्या सायकल फेरी मार्गाची लांबी 9 की मी असल्याची देखील माहिती मिळाली आहे.जरी एकीकरण समितीने संभाजी चौकातून परवानगी मागितली असली तरी मागील वर्षी प्रमाणे संभाजी उद्यान मधूनच परवानगी मिळणार आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनाने काळ्या दिनाची तयारी म्हणून बैठक घेतली आहे.मंगळवारी सकाळी खडे बाजार पोलीस स्थानकात समिती नेते, शिवसेनेचे पदाधिकारी आणि समिती कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली आहे.खडे बाजार पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी मराठी भाषकांना कोणत्याही स्थितीत कुणीही कायदा हातात घेऊ नये शांतता पाळा असे आवाहन केलं आहे.
खडे बाजार पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील काळ्या दिनात सहभागी होण्यास संभाजी उद्यानाकडे जाणाऱ्यांनी कन्नड मराठी संघर्ष होऊ नयेत यासाठी सूचना केल्या त्यावेळी समिती नेत्यांनी आपण उत्तर भागातून एकत्रित रित्या रॅली सह समिल होणार नसल्याचे सांगितले तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपण रामलिंग खिंड गल्लीतून रॅली सह सहभागी होणार असल्याची माहिती दिली.