आपण सहकारी खात्याचा अधिकारी असल्याचे भासवून सहकारी सोसायट्यांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला मारिहाळ।पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.सांबरा येथील जगन्नाथ सोसायटीच्या जागृत संचालकांनी ही कारवाई केली आहे.
श्रीधर महावीर मुतगी रा.महाद्वार रोड बेळगाव असे या भामट्याचे नाव आहे.या बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी सकाळी सांबरा येथील शिवाजी चौकातील जगन्नाथ सोसायटीत आपण सहकार खात्यातून आल्याचे सांगून ऑडिट फी म्हणून 15 हजार रुपये देण्याची मागणी केली.याबाबत संचालकाना संशय आल्याने त्यांनी सहकारी सौहार्द खात्याच्या कार्यालया धाव घेतली त्यावेळी काही संचालकांनी त्या भामट्याला विविध विषयावर संभाषण करत गुंतवून ठेवलं त्या नंतर सौहार्द खात्याचे अधिकारी श्रीकांत बरवे आणि बसवराज होंगल यांनी सांबरा येथे धाव घेऊन भामट्यावर प्रश्नांचा भडिमार केला त्यावेळी त्याचे पितळ उघडे झाले.
आपण पैसे कमवण्यासाठी हा बनाव केले असल्याचे त्यांने कबूल केले या प्रकरणी सदर संस्थेने मारिहाळ पोलिसात तक्रार नोंद केली असून तपास सुरू आहे.