मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये शंभरावा शरकत दिन साजरा करण्यात आला.शरकत दिन कार्यक्रमाला उप लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नू उपस्थित होते.
मराठा सेन्टरमधील युद्ध स्मारकाला पन्नू आणि इतर मान्यवरांनी शरकत युद्धात शहीद झालेल्या जवान आणि अधिकाऱ्यांना आदरांजली वाहिली.२९ ऑक्टोबर १९१८ रोजी पहिल्या महायुद्धात शरकत (सध्या हे ठिकाण इराकमध्ये आहे) येथे ११४ मराठाने मिळविलेल्या युद्धातील विजयाच्या स्मरणार्थ शरकत दिन साजरा करण्यात येतो.
११४ मराठाने मिळविलेल्या निर्णायक विजयामुळे युद्धामुळे पहिल्या महायुद्धाची सांगता झाली.या युद्धात ११४ मराठाला ३६ शौर्यपदके मिळाली.इतकी शौर्य पदके एकावेळी कोणत्याही बटालीयनला मिळली नाहीत.
११४ मराठाच्या अतुलनीय कामगिरीबद्दल आणि त्यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण करण्यासाठी शरकत दिन साजरा केला जातो असे उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नू यांनी सांगितले.निवृत्त लष्कर प्रमुख जनरल जे.जे.सिंग यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.