Wednesday, December 25, 2024

/

‘आता.. खराब हवामान धुकं पाऊस असला तरी विमान होणार लँडिंग’

 belgaum

धुकं पाऊस आणि खराब हवामानात देखील बेळगाव विमान तळावर विमानाचे लँडिंग होण्यास मदत होणार आहे कारण या विमान तळाला अत्याधुनिक बनवून आय एल एस(instrument landing system) ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आय एल एस ही अशी सिस्टम विमान तळावर असल्याने धुकं,पाऊस आणि खराब हवामान असले तरी विमान लँडिंग होऊ शकणार आहे. तब्बल सात कोटी खर्चून ही सुविधा बेळगाव विमान तळावर बसवून अत्याधुनिक केले जाणार आहे.

सरकारने आय एल एस ला मंजुरी दिली असून लवकरच टेंडर देऊन कामाला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात याचे मशीन येणार आहे आणि पुढील वर्षी एप्रिल पर्यंत याचं काम पूर्ण होईल अशी आशा एअर पोर्ट संचालक राजेश कुमार मौर्य यांनी दिली आहे.

AIRport

जुनी टर्मिनल बिल्डिंगचा वापर कार्गो साठी करण्याचा विचार आहे हे देखील लवकरच काम सुरू होणार आहे त्यामुळं भविष्यात एअर कार्गो देखील सुरू करण्यास सुविधाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणि 320 एअर बस तीन विमान आणि ए टी आर 72 प्रकारची दोन विमान एकाच वेळी उतरू शकतात पार्क करू शकतात एवढी क्षमता या बेळगाव विमान तळाची आहे. हे विमान तळ 320 एअर बस उतरू शकेल याचा विचार पुढे करूनच बनवलं आहे अतिशय उत्तम अशी नाईट लँडिंग सुविधा या विमान तळावर आहेत असेही मौर्य म्हणाले.

एअरपोर्टचा विकास झाल्यास शहराचं सर्वांगिण विकास शक्य आहे बेळगाव शहरात बेळगाव विमान तळाला पोटेनशियल आहे आता पर्यंत सुरू असलेल्या विमान सेवेत 80 टक्क्यांहून अधिक लोड फॅक्टर आहे त्यामुळे नक्कीच अधिकाधिक विमान सेवा या भागातून सुरू होईल असेही त्यांनी पुढं नमूद केलं.

उत्तम नाईट लँडिंग फॅसिलिटी मुळें महाराष्ट्रातील अनेक मंत्री रात्रीच्या वेळी बेळगाव विमान तळाचा वापर करत असतात मात्र आता आय एल एस सुविधे मुळे यात आणखी भर पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.