141 कोटी खर्चून बांधलेल्या सुसज्ज अश्या बेळगाव विमान तळावरून अधिकाधिक विमानांनी उड्डाण घ्यावी अशी मागणी सिटीझन कौन्सिल च्या वतीने केंद्रीय विमान उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या कडे केली आहे.
सोमवारी सकाळी सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या बेळगाव नेतृत्वात विमानतळ संचालक राजेश कुमार मौर्य यांच्याशी चर्चा करून मंत्र्यांना निवेदन दिले आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेच्या पहिल्या दोन टप्प्यात बेळगावचा समावेश होऊ शकला नव्हता आता तिसऱ्या टप्प्यात तरी उड्डाण योजना लागू करा अशी मागणी करण्यात आली असून जर का उडान मध्ये बेळगावचा समावेश न झाल्यास विमान सेवा वाढवा अशीही आग्रही मागणी केली आहे.
यावेळी राजेशकुमार मौर्य यांनी निवेदनाचा स्वीकार करत मंत्र्यांना निवेदन पाठवले.बेळगाव विमान तळावर असलेल्या मूलभूत सुविधांचा वापर करण्यासाठी अधिकाधिक विमान सेवा सुरू करावे असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी सिटीझन कौन्सिलचे सेवंतीभाई भाई शाह,विकास कलघटगी आदी उपस्थित होते.