बऱ्याच कारणांनी वादात अडकलेल्या पीएलडी बँक निवडणुकीने सर्व राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. लक्ष्मी आक्का आणि सतीश सावकार यांच्यातील वाद मिटून समजोत्याने अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाल्यानंतर आता एक शॉकिंग बातमी हातात आली आहे. या बँकेचे अध्यक्ष महादेव पाटील यांचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे.
महादेव पाटील हे उचगावचे. समितीच्या कामात पूर्वीपासून निष्ठतेने काम करत होते. सध्या ते लक्ष्मी हेब्बाळकर यांचे समर्थक होते. निवडणुकीच्या वादावर तोडगा काढताना अध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात लक्ष्मी यांनी खूप प्रयत्न केले होते. त्यांचे निधन हेब्बाळकर यांच्यासाठी मोठा धक्का बसला आहे.
नेहमीप्रमाणे ते आज बँकेला गेले होते. नेहमीच्या सह्या करून ते त्यानंतर फुलबाग गल्ली येथे ते आपल्या मुलीच्या घरी गेले होते. तेथे जेवण केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले एक उलटीही झाली आणि उपचाराचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना झटका आला व ते मृत्युमुखी पडले आहेत. दिल्ली मुंबई त्यांनी अनेक सीमा लढ्यातील आंदोलनात सहभाग घेतला होता. माजी आमदार प्रभाकर पावशे यांचे देखील ते खंदे समर्थक होते.
महादेव पाटील हे ८३ वर्षांचे होते. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते. भाई एन डी पाटील यांच्याशी त्यांचा जवळचा सबंध होता. मनोहर किणेकर यांना आमदारकीची उमेदवारी मिळवून देऊन आमदार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मागील लोकसभा निवडणुकी पासून ते काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या जवळचे झाले होते यातूनच त्यांना हे अध्यक्षपदही मिळाले होते.
त्यांच्या पश्चात सात मुली दोन मुलगे नातू सुना आदी असा परिवार असून ब्रह्मानंद पाटील हे त्यांचे चिरंजीव उचगावं ग्राम पंचायतीचे सदस्य आहेत. सोमवारी रात्री साडे आठ च्या दरम्यान उचगाव येथे अंतिम संस्कार केला जाणार आहे.
Maje aawdte Anna tumchya atmyala RIP……