कणबर्गी येथे मिरवणुकीने शिवपुतळा घेऊन जात असताना समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना केल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. हा ताण निवळण्यास माळमारुती पोलिसांनी प्रयत्न करून सर्व शांत केले आहे. या घटनेबद्दल कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता पाळण्याची गरज आहे.
बेळगाव कडून कणबर्गी कडे जाण्याच्या मार्गावर आझाद नगर जवळ मिरवणूक आलेली असताना ही घटना घडली होती. यावेळी प्रत्युत्तर म्हणून ही दगडफेक झाली होती.
पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी उपस्थित होऊन तणाव निवळला आहे. मिरवणूक सुरक्षितपणे पुढे पाठवली असून ती आता कणबर्गी कडे पोचण्याच्या टप्प्यात आहे.
याबद्दल अनेक अफवाही पसरविल्या जात असून त्यावर विश्वास न ठेवता शहराचे वातावरण शांत ठेवावे असे आवाहन पोलीस खात्यातर्फेही करण्यात आले आहे.