कपिलेश्वर कडून शनी मंदिराच्या दिशेने येणाऱ्या माल वाहूट्रकने चार दुचाकीना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघे जण जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.
शनी मंदिर समोर कपिलेश्वर उड्डाण पुलावर सायंकाळी पवणे सातच्या दरम्यान हा अपघात घडला असून या रोड वर ट्रॅफिक जाम झाला होता या भागातली ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आली आहे. शाबीर इनामदार आणि सायरा इनामदार रा. पाचवा क्रॉस शिवाजी नगर बेळगाव दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत.
घटनास्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार एम एच 10 ए क्यू 5051 या मालवाहू ट्रक ने के ए 22 डी एल 4349 या दुचाकीला धडक दिली आहे जखमींना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
ट्रक वर मध्येअधिक माल असल्याने ट्रक ब्रिज वरून खाली उतरताना ब्रेक फेल झाल्याने त्याचे नियंत्रण सुटले अन त्याने तीन चार वाहनांना धडक दिली त्यापैकी बाकी सगळे बचावले मात्र दुचाकी वरून जाणारे पती पत्नी हे ट्रक च्या धडकेत जखमी झाले सदर महिलेला किरकोळ दुखापत झाली असून तिच्या पती मात्र गंभीर जखमी झाला आहे.अपघात स्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.
कपिलेश्वर उड्डाण पुलावर अपघातांची संख्या वाढली आहे.या अपघाताची रहदारी पोलिसांत नोंद झाली आहे.