कडोली गावात भव्य असे मैदान आहे. परिसरातील सर्व मुले या मैदानावर खेळण्यासाठी येत असतात. मात्र आता त्यांच्या खेळण्यावर रोख बसणार असून त्या जागी स्टेडियम बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे येथील मुलांनी खेळायचे कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुमारे २० एकर जागेत हे स्टेडियम उभारण्यात येणार आहे. मात्र येथे स्टेडियम बांधण्यात येणार असल्याने येथील मुलांना मात्र रानोमाळ भटकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. गावात याबाबत बैठक घेऊन प्रत्येकाचे विचार ऐकून घेण्याची गरज आहे.
आमराई येथे स्टेडियम झाले तर याचा फटका कडोली गावातील खेळाडूंबरोबरच इतर गावातील मुलांनाही बसण्याची शक्यता आहे. मागील वेळीही याची चर्चा सुरू असताना काहींनी याला विरोध केला होता. मात्र आता पुन्हा स्टेडियमच्या हालचाली गतिमान झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी येथील खेळाडूंना मात्र भटकंती करावी लागणार आहे.
कडोली हे खेळाडूंचे माहेर घर आहे. येथील खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव लौकिक केले आहे. मात्र त्यांच्या या मैदानावर आता कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे याबाबत विरोध करण्याची गरज निर्माण झाली आहे. नेत्यांच्या राजकारणात खेळाडू मात्र वाऱ्यावर पडण्याची शक्यता आहे. लवकरच या स्टेडियमच्या कामाचा नारळ फोडण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. गावच्या राजकारणात आणि विकासाचे गाजर दाखवून येथील खेळाडूंना मात्र भटकंती करण्यास भाग पाडण्याचा घाट घालण्यात येत आहे.
Nic