शिवजयंती दिवशी काळा दिन पाळू असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या त्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांने राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या दणक्या नंतर माफीनामा देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
राज्योत्सवाच्या बैठकीत हे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या करवे च्या नेत्याचे नाव जाहीर झाले नव्हते त्यामुळे बराच संभ्रम निर्माण झाला होता मात्र राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच नाव महांतेश रणगट्टीमठ असून तो करवे च्या प्रवीण शेट्टी गटाचा प्रमुख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजां वर असे वक्तव्य झाल्या नंतर अनेक युवा संघटनेच्या कार्यकर्त्यानी याचा निषेध केला होता बऱ्याच हिंदुत्ववादी संघटनांवर टीका झाली होती याची दखल राम सेना हिंदुस्तान या संघटनेचे घेऊन त्या कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्याला गाठून त्याच्या कडून दिलगिरी व्यक्त करवून घेतली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल केलेल्या वक्तव्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करू अशी माहिती त्याने आम्हाला दिली असेही राम सेनेच्या कार्यकर्त्यानी म्हटलं आहे.
एकूणच मराठी संस्कृतीच्या द्वेषा पोटी वक्तव्य केलेल्या त्या करवे नेत्यांला हे प्रकरणात चांगलच शेकल आहे.