महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांची तोफ आता धडाडली आहे. बेळगावमध्ये काळा दिन केलात तर आम्ही शिवजयंतीला काळा दिन करू असे विधान करणाऱ्यांविरुद्ध ही तोफ आहे, तसेच शेळके यांनी आव्हान दिले आहे मराठी मतांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाही. तुम्ही हिंदुत्व म्हणता त्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज आहेत तेंव्हा त्यांच्या विरुद्ध अपमान होत असताना हिंदुत्वाच्या नावावर निवडून येणारे कुठे गेले असा प्रश्न करून आता तुम्ही काय करणार सांगा असा प्रश्न त्यांनी नाव न घेता विचारला आहे.
कर्नाटक राज्योत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत काळ्या दिनाला विरोध करीत काहींनी जर राज्योत्सवाला काळा दिन होत असेल तर आम्ही शिवजयंतीला काळा दिन साजरा करू असे विधान केले होते. हे विधान सीमाभागात संतापाची लाट आणणारे ठरले असून आता युवा समिती सुद्धा संतप्त झाली आहे.
आमच्या राज्याचे नाव घेताना विचार करून बोला नाहीतर शांत राहणार नाही असे सांगून युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी इशाराच दिला आहे.
राज्यांचा अपमान झाला असताना हिंदुत्ववादी नेते गप्प का असा प्रश्न करून त्यांनी इशारा दिलाय आता ते नेते काय उत्तर देतात हे बघावे लागेल.