कडोली येथे मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मास्टरप्लॅनच्या गोंधळात आता प्रत्यक्ष मास्टरप्लॅन सुरू होण्यास दिवाळीनंतर मुहूर्त शोधण्यात आला आहे. ज्यांची घरे यामध्ये जाणार आहेत त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.
कडोली येते ४५ फूट रस्ता मास्टर प्लॅनमध्ये जाणार आहे. हा रस्ता करण्यासाठी ग्राम पंचायत ने एक बैठकीत विरोधही करण्यात आला होता. मात्र याला झुगारून लावत दिवाळीनंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांची घरे जाणार आहेत त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात येत आहे.
ग्राम पंचायतमध्ये ज्यांची घरे जाणार आहेत त्यांना नुकसान भरपाई देण्याऐवजी घरे मंजूर करू , असे सांगण्यात येत आहेत. मात्र याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे घेण्यात आलेली बैठक फोल ठरली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून हे काम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे.
मास्टर प्लॅनला विरोध होत असताना याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे. हा रस्ता फक्त गावापुरताच का मर्यादित ठेवण्यात आला आहे. जर करणारच असेल तर हा रस्ता कंग्राळी ते बेंनाली पर्यंत करावा अशी मागणी करण्यात येत आहे.