काळा दिन जवळ येईल तसे स्वाभिमानी मराठी तरुण जोरदार कामाला लागले आहेत. स्वताच्या खर्चाने वेगवेगळे प्रोमो आणि आवाहने तयार करून सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर सायबर वार निर्माण झाला आहे. स्वताच्या प्रेरणेतून होत असलेली जागृती पाहता नेत्यांनाही लाजवेल असे काम तरुणांनी सुरू केले आहे.
१ नोव्हेंबर रोजी सीमावासीय काळा दिन साजरा करून केंद्र सरकारकडे आपली भावना व्यक्त करतात. आम्हाला महाराष्ट्रात घाला ही मागणी केली जाते. या लढ्यात काही वर्षांपासून तरुण पिढी आघाडी घेत आहेत. जास्तीत जास्त तरुणांना जमवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. यावर्षी हे प्रमाण जास्त वाढले आहे. सोशल मीडियावर होत असलेली जागृती पाहता तरुणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. हजारोंच्या संख्येने व्हिडीओ बनवले जातात आणि मिनीट मिनिटाला आवाहन बाहेर पडते ही ताकत सीमालढ्याला बळकट करत आहे.
एकादा लढा किंव्हा कार्यक्रम यशस्वी करायचा असल्यास राष्ट्रीय पक्ष आपली सोशल मीडियाची टीम कामाला लावतात. लाखो नव्हे तर करोडो रुपये फक्त या टीम साठी खर्च केले जातात. पण सीमाभागात नेत्यांना सोशल मीडिया म्हणजे काय हेच माहीत नाही आणि तरुण वर्ग सोशल मीडियावर आक्रमक हे चित्र आहे. त्यामुळे काळ्या दिनाला होणारी गर्दीचे श्रेय यावेळी कुणी नेत्याने न घेता पूर्णपणे तरुणांनाच द्यावे लागणार आहे.
राष्ट्रीय पक्ष लाखों रुपये खर्च करून सोशल मीडियावर इव्हेंट पब्लिसिटी करत असतात भाजप काँग्रेस त्यात आघाडीवर आहे मात्र बेळगावच्या या लोक लढ्यात मराठी युवकांनी स्वयं प्रेरणेतून कुणा कडूनही आर्थिक मदत न घेता सीमा लढ्याच्या बळकटीकरणासाठी सायबर वार सुरू केलंय ते लढ्याला बळकटी देईल मात्र समिती नेते युवकांना कधी नेतृत्व देतात हे पहावे लागेल.
आजवर कुठल्याच समिती नेत्यांकडून पैशांची अपेक्षा न ठेवता तरुण सोशल मीडियावर काळ्या दिनाच्या जागृतीचा पाऊस पाडवत आहेत त्यांचे काम अफाट आहे. यातून १ नोव्हेंबर ला मूक आणि शांततेचे आंदोलन करण्यासाठी लाखो तरुण सहभागी होतील अशी आशा निर्माण होत आहे.