महाराष्ट्र गुजरात च्या पाठोपाठ कर्नाटकाचा सहकार क्षेत्रात तिसरा क्रमांक लागतो त्यामध्ये उत्तर कर्नाटकाचे सहकार क्षेत्रात विशेष योगदान आहे खरं तर शेजारील महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राचा प्रभाव प्रामुख्याने बेळगाव जिल्ह्यावर झालाय त्यामुळेच बेळगाव जिल्ह्यात सहकारी पथ पिढ्या नागरी बँका व साखर कारखानदारींचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरलं आहे.अलीकडेच सहकार क्षेत्रात राजकारणी आणि आर्थिक हित जपणाऱ्यांची घुसखोरी वाढल्याने सहकार क्षेत्र मोडकळीस येऊ लागल्याचे चित्र दिसते त्यामुळे सहकाराचा मूळ हेतुच बाजूला पडला आहे.विशेष म्हणजे आपले आर्थिक हित जपण्यासाठी सहकारी पथ पेढ्या व प्रामुख्याने सौहार्द सारख्या संस्थांचे पेव वाढले आहे.
बेळगाव जिल्ह्यात सुमारे 27 हजार सहकारी पथ संस्था असून त्यापैकी बऱ्याचशा पथ पेढ्या दिवाळ खोरीत गेल्या आहेत.कर्ज वाटप करताना कोणतेच नियम न पाळल्या गेल्याने कर्जाचे वाटप सुरू आहे काही संस्था बँका मधून तर मोठ्या कर्जासाठी टक्के वारी घेतली जाते तर काही छोट्या संस्था कर्ज मंजुरीसाठी सायंकाळीच्या मेजवानीची बैठक करताना दिसतात त्यामुळे ठेवीदार व सर्व सामान्य ग्राहकांचा सहकार चळवळीवरील विश्वास उडत चालला आहे.गेल्या दहा वर्षातील उपलब्ध आकडेवारी वरून सहकारी बँकातून पेढ्या मधील ठेवी ठेवण्याचे प्रमाण घटले आहे केवळ चांगल्या संबंधातून ग्राहक आपल्या ठेवी संबंधित पथपेढ्यात ठेवतो मात्र ठेवी कश्या सुरक्षित रहातील याकडे बहू संख्य पत पेढ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही सामूहिकपणे संचालकाची असते मात्र पत पेढ्यातून एक किंवा दोघे जण मिळूनच पथ पेढ्यांचा कारभार करताना दिसतात.अलीकडे तर ज्या सौहार्द संस्था स्थापन केलेल्या आहेत त्यामधील ठेवी संचालकांनी आपल्या स्वतःच्या हितासाठी वापरल्या आहेत सौहार्द संस्थांच्या बहुतेक ठेवीचा वापर हा अगदी जमीन खरेदी गुंतवणुकीत केल्याने ग्राहकांचे पैसे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.
राज्य सरकारने मुळातच सौहार्द संस्थांची स्थापना करून एक प्रकारे राजकारण्यांना आणि लहान रियल इस्टेट एजंटना पैसे गुंतवायला मोकळे रान करून दिल आहे त्यामुळेच भ्रष्टाचाराच्या घटनाही वाढीस लागल्याचे चित्र आहे. खरं तर सौहार्द संस्था कायद्या मुळे सहकाराचे मूळ ध्येयालाच धक्का बसला आहे आज प्रामुख्याने सौहार्द संस्था विषयी कानावर चांगले येत नाही एका उपलब्ध माहिती नुसार जवळ जवळ पन्नास टक्के सौहार्द संस्था या दिवाळ खोरीत आहेत त्यावर राज्य सरकारच्या सहकार खात्याचे कोणतेच नियंत्रण नाही त्यामुळं बँक व्यवस्थापणालही कोणतीच भीती उरली नाही विशेष म्हणजे या संस्थांवर कारवाई करण्याचा ही अधिकार सहकार खात्याला नाही त्यामुळेच सहकार खात्यामध्ये फार मोठया प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे.
-जेष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे
क्रमशः
यात वाय बी. चौगुले च्या संस्था अधिक आहे ज्याचा तो संस्थापक आहे. आणि तरीही त्याला सरकार कडून महर्षी म्हणून किताब मिळाला आहे. तो सरकारनी पहिला काढून घ्यावा.