कंत्राटी पद्धत रद्द करून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून करून घ्या अशा आशयाचे निवेदन कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या जिल्हा विभागाच्या कंत्राटी कामगार मंचने जिल्हा प्रशासनाकडे केले आहे .
आरोग्य खात्याने कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुकती न करता त्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे तसेच कामाच्या तुलनेत मोबदला द्यावा अशी मागणी आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली .
गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शन केली.कंत्राटी पद्धत बंद करा कामाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना वेतन द्या यासह अन्य मागण्यासाठी कंत्राटी कामगार मंचच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी सरदार मैदानावरून घोषणाबाजी करत चननम्मा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आंदोलन छडले.
यावेळी आरोग्य खात्यात सेवा बजावणारे कर्मचारी आक्रमक झाले होते सरकार विरोधात त्यांनी जोरदार निदर्शन करत घोषणाबाजी केली.