तीन टन पेक्षा अधिक वजन वाहू अवजड वाहनांना शहरात नो एन्ट्री केली जाणार आहे. आगामी 28 ऑक्टोबर पासून अवजड वाहनाना शहर हद्दीत बंदी घालण्यात आली आहे पोलीस आयुक्तांनी तसा आदेश काढला आहे.पोलीस आयुक्तांनी 1988 च्या मोटार वाहन कायद्या अंतर्गत सदर आदेश बजावला आहे.
वाढत्या ट्रॅफिक ची समस्या ध्यानात घेऊन अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.28 ऑक्टोबर पासून सकाळी 8 ते दुपारी 12 सायंकाळी 4 ते 8 या वेळेत शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4 अ वर देखील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
सध्या शहरात रेल्वे उड्डाण पुलांचे काम सुरू आहे त्यातच रिंग रोड नाही त्यामुळं अवजड वाहने शहरातून फिरत आहेत याचा फटका शहरातील ट्रॅफिक वाढीला बसत आहे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम ची दृश्ये पहायला मिळत आहेत.
एन एच 4 अ मधील अडवली जाणारी अवजड वाहने शहरात सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात कुठं अडवली जातील अडवून कुठं थांबवली जातील याची माहिती पोलिसांनी अजून जारी केलेली नाही.पोलीस आयुक्तां सह जिल्हा पोलिसांनी देखील हा आदेश बजावला आहे मात्र जिल्ह्यात याचा परिणाम जाणवणार नाही.बेळगाव शहर लिमिट्स मध्ये केलेली नो एन्ट्री चा फरक कितपत होईल याची अंमलबजावणी होईल की आदेश कागदोपत्री राहील हे पहावं लागणार आहे.