शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीस आणलेल्या कांद्याचा भाव घसरल्याने चिडलेल्या शेतकऱ्यांनी गेट बंद आंदोलन केलं आहे.बुधवारी दुपारी ए पी एम सी गेट समोर ठिय्या आंदोलन करत टायर जाळले गेट बंद करून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
गेल्या दोन दिवसात पाचशे ट्रक हुन अधिक कांद्याची आवक मार्केट यार्डात झाली आहे या कांद्याला खरीद दार नसल्याने दहा रुपये प्रति किलो एवढा कमी दर घसरला आहे.मार्केट मध्ये आवक झालेला कांद्याचा दर्जा उत्तम नसल्याने परगावी नेई पर्यंत खराब होत आहे त्यामुळे हा दर घसरला आहे.
मागील वेळी या कांद्याचे दर दहा रुपये पर्यंत घसरला होता आताही तीच स्थिती आहे त्यामुळं चिडलेल्या शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.आंदोलक इतके शेतकरी संतप्त झाले होते की त्यांनी टायर पेटविला होता.आंदोलन स्थळी ए पी एम सी पोलिसांनी धाव घेऊन शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न चालवला आहे.