शाळकरी मुलांची राज्यस्तरिय स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धा घेण्यात आली होती.११ व १२ ऑक्टोबर रोजी बंगळूर येथे झालेल्या या स्पर्धेत बेळगावच्या १५० स्केटर्स नी भाग घेऊन एकूण १५ पदके मिळवली आहेत. यामध्ये ७ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
१४ वर्षाखालील मुलांच्या स्केटिंग गटात सेंट झेवीयर्स च्या नागराज देसाई याने १ सुवर्ण व १ कांस्य, के ले एस च्या यशवर्धन परदेशी याने २ रौप्य व १ कांस्य
१४ वर्षाखालील मुलिंच्या स्केटिंग गटात एम व्ही हेरवाडकर च्या श्रुती होंनगी हिने २ सुवर्ण , डीपी स्कुलच्या श्रेया वाघेला हिने १ रौप्य
१७ वर्षाखालील मुलींच्या स्केटिंग गटात जी जी चिटणीस च्या शिवानी वाघेला हिने १ सुवर्ण आणि १ रौप्य
१४ वर्षाखालील मुलींच्या इनलाईन स्केटिंग गटात फिनिक्स स्कुल च्या मुस्कान शेख ने ३ सुवर्ण
१४ वर्षाखालील मुलांच्या इनलाईन स्केटिंग गटात ज्ञान प्रबोधन मंदिर च्या अमेय याळगी याने २ सुवर्ण, १ कांस्य अशी पदके मिळवली आहेत.
सर्व स्केटिंग पटू मागील सहा वर्षांपासून के एल ई संस्थेच्या तसेच गुड शेफर्ड शाळेच्या स्केटिंग रिंकवर सराव करीत असून बेळगाव रोलर स्केटिंग अकादमी चे अध्यक्ष उमेश कलघडगी, डीपीआयओ सदानंद कट्टीमनी यांचे प्रोत्साहन तर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, प्रशांत कांबळे, विठ्ठल गंगणे, आदित्य अष्टेकर, योगेश कुलकर्णी, करूणा देशपांडे व सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.