गणपत गल्ली येथे 85 हजार खर्च करून व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. मात्र काही भांमटयानी येथील कॅमेरेच चोरल्याची घटना घडली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी केलेला खर्च वाया गेल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
2013 साली व्यापाऱ्यांनी सुमारे 14 कॅमेरे बसविले होते मात्र आताम चोरट्यानी हे कॅमेरे पळविले आहेत. काही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत होते याचा फटका बसला आहे. याबाबत पोलिसांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
14 कॅमेऱ्याना मिळून 85 हजार रुपये खर्च करण्यात आला होता दरम्यान बाजारपेठेत कोणतेही अनुचित प्रकार प्रकार घडल्या वर नजर ठेवण्यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले आहे. मात्र चोरट्यानी यांच्यावरच डल्ला मारल्याने व्यापारी वर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कॅमेऱ्याची समस्या लवकरात लवकर मिटवून तेथील अनुचित प्रकार बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. जर ही समस्या तशीच राहिली तर फेरीवाले व इतरांना याचा फायदा होणार असून याबाबत लवकरच लोक प्रतिनधीना भेटण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर या समस्येवर तोडगा काढण्यात येणार आहे.