महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दर वर्षी एक नोव्हेंबर राज्योत्सव दिनी पाळण्यात येणारा काळा दिन हा सरकारच्या दृष्टीने काय नवा विषय नाही जे कायद्याचा भंग करतील अश्या समाज कंटकां विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री जी परमेश्वर यांनी व्यक्त केली आहे.ते जमखंडी येथील विधान सभा पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी बेळगाव विमान तळावर आगमन झालं त्यावेळी पत्रकारांना बोलताना व्यक्त केली आहे.
मणिपूर येथे सी आर पी एफ चा गोकाकच्या हुतात्मा जवान उमेश हेळवार यानें वीस लोकांचे जीव वाचवत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आहे अश्या शूर योध्यास नमन अश्या शब्दात त्यांनी शहीद जवानास आदरांजली वाहिली. जवानाच्या पार्थिवावर विमान तळावर पुष्प चक्र अर्पण करून त्यांनी राज्य सरकारच्या वतीने शहीद जवानाच्या कुटुंबियास मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
जमखंडी विधानसभा मतदार संघातील प्रभारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे पाचही मतदार संघात काँग्रेसचा विजय होईल या पोट निवडणुकांच्या निकालाने संमिश्र सरकारला बळ मिळेल मात्र पुढील लोकसभा निकडणुकीची ही सेमी फायनल नव्हे केंद्रात भाजप सत्तेत येऊ नये यासाठी आमचे प्रयत्न असतील असेही ते म्हणाले.
रमेश जारकीहोळी आणि डी के शिवकुमार हे दोघेही मित्र आहेत एकमेकांना विरोधात वक्तव्ये करू नयेत म्हणून दोघांनाही सूचना देऊ असेही त्यांनी नमूद केलं.
काळ्या दिनाला परवानगीचा मार्ग मोकळा-
गृह मंत्री जी परमेश्वर यांच्या वक्तव्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या परवानगी मिळण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झाला आहे. समितीला मात्र कायद्याच्या चौकटीतून आंदोलन करावं लागणार आहे. कोण कोणत्या अटी घालून परवानग्या देतात हे पहावे लागणार आहे.