तिलारी डॅम मध्ये बुडालेल्या त्या दोन युवकांचे मृतदेह शोधण्याचे काम दुसऱ्या दिवशीही चालूच राहिले पण यश आले नाही. बेळगाव पोलीस व चंदगड पोलीसांनी संयुक्तरित्या स्थानिक कार्यकर्त्यांना घेऊन मोहीम राबविली आहे. आता उद्या जोरदार शोध होणार आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक स्वतः तिलारीत रविवारी सकाळ पासून ठाण मांडून होते. काल बेळगाव जिल्ह्यातून पाच जण तिलारी येथे आले होते ते कोण होते हे समजून घेण्यासाठी पोलिसांना आजची दुपार झाली त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना देखील तिलारीत बोलवून घेऊन शोध जारी ठेवण्यात आला होता.
अमृत,प्रभाकर,रवी,सोहेल,शिवशंकर हे संकेश्वरचे पाच जण आले होते त्यापैकी सोहेल व शिवशंकर बुडाले आहेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रविवारी सायंकाळ पर्यंत मृतदेह मिळतील असा अंदाज चंदगड येथील स्थानिक लोकांनी व्यक्त केला होता पण यश न आल्याने बेळगाव हुन अग्निशामक दलाच्या पथकाला देखील शोध कार्यातील मदतीसाठी बोलवण्यात आले होते.चंदगड पोलीस,बेळगाव ग्रामीण पोलीस,स्थानिक कार्यकर्ते आणि बेळगाव अग्निशामक दालने शोध कार्य सुरू केलं होतं. आता उद्या बोटींच्या साहाय्याने मदतकार्य होणार आहे.