तिलारी डॅम मध्ये बुडालेल्या त्या दोन युवकांचा मृतदेह शोधण्याचे काम दुसऱ्या दिवशीही चालूच असून याकामी बेळगाव पोलीस चंदगड पोलीस स्थानिक कार्यकर्त्यांनी मिळून संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक स्वतः तिलारी जवळ त्या घटनास्थळी रविवारी सकाळ पासून ठाण मांडून आहेत अजूनही याचा तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल बेळगाव जिल्ह्यातून पाच जण तिलारी येथे आले होते ते कोण होते हे समजून घेण्यासाठी आजची दुपार झाली आता कोण आलेत याची माहिती मिळाली असून त्यांच्या नाते वाईकांना देखील तिलारीत बोलवून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमृत,प्रभाकर,रवी,सोहेल,शिवशंकर हे संकेश्वरचे पाच जण आले होते त्यापैकी
सोहेल व शिवशंकर बुडाले आहेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रविवारी सायंकाळ पर्यंत मृतदेह मिळतील असा अंदाज चंदगड येथील स्थानिक लोकांनी व्यक्त केला असला तरी बेळगाव हुन अग्निशामक दलाच्या पथकाला देखील शोध कार्यातील मदतीसाठी बोलवण्यात आले आहे.चंदगड पोलीस,बेळगाव ग्रामीण पोलीस,स्थानिक कार्यकर्ते आणि बेळगाव अग्निशामक दालने शोध कार्य सुरू केलं आहे.