गदग तोंटदार्य मठाधिश जगद्गुरू डॉ सिद्धलिंग स्वामीजी यांचे निधन कालच झाले. आज दुपारी ४ वाजता त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत, याचवेळी नूतन मठाधिश म्हणून बेळगाव येथील नागनूर रुद्राक्षमठाचे स्वामीजी म नी प्र डॉ सिद्धराम स्वामीजी यांची निवड झाली आहे.
कर्नाटकातील विविध मठाधिशांनी ही निवड आज गदग येथून जाहीर केली आहे. नागनूर स्वामी आता या मठाचे विसावे मठाधिश ठरणार आहेत.
१० वर्षांपूर्वी तोंटदार्यांनी आपले मृत्युपत्र लिहून ठेवले होते त्यानुसार राज्यातील विविध मठाधिशांनी रविवारी सकाळी ही निवड जाहीर केली आहे.