बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे. मात्र येथील अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. जर सरकारी काम करावयाचे नसेल तर राजीनामे द्या अश्या सूचना वजा इशारा महसूल मंत्री आर व्ही देशपांडे यांनी घेतलेल्या बैठकीत दिला. यामुळे साऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच पंचायत झाली आहे.
बेळगाव जिल्हा पंचायती मध्ये त्यांनी शनिवारी दुपारी दुष्काळा बाबत बैठक बोलाविली होती. यावेळी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. एकीकडे दुष्काळाने नागरिक हैराण झाले असताना अधिकारी मात्र आपल्या मर्जीतील लोकांनाच मदत करत असल्याचे दिसून येत आहे. यापुढे असे प्रकार खपऊन घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. मात्र पूर्वीप्रमाणे केवळ 10 तालुक्यातील नागरिकांना महत्व दिले जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला . यावर देशपांडे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुके महत्वाचे असून असा भेदभाव आपण करत नाही आणि कोणी तो करूही नव्हे असे ते म्हणाले. यापुढे तरी दुष्काळा बाबत गंभीर्याने लक्ष देण्याची आवाहन त्यांनी केले.
कोणी अधिकाऱ्याने आपला मनमानी कारभार सुरू केला असेल तर त्याची गय केली जाणार जाणार नाही. कोणतेही काम असो वा दुष्काळग्रस्त भागात मदत द्यायची असल्यास त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी ना बोलावून ती कामे करावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बैठकीला आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.