देव, देश, धर्म रक्षणाची प्रेरणा देणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गा माता दौडला प्रचंड प्रतिसाद लाभला. खासबाग, भारत नगर, वडगाव आणि जुने बेळगाव भागात हजारो शिवप्रेमींनी भाग घेऊन चैतन्यमय वातावरण निर्माण केले. परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे दौडीचे स्वागत केले. बसवेश्वर चौक खासबाग येथे दुर्गा माता मंदिर येथून दौडीस प्रारंभ करण्यात आला .
उपमहापौर मुधुश्री पुजारी हस्ते ध्वज चढवून नगरसेवक रतन मासेकर, मनोहर हलगेकर यांच्या उपस्थितीत आरती करून प्रेरणा मंत्र सांगून दौडीस सुरवात करण्यात आली.
पारंपरिक पेहरावात सहभागी झालेले तरुण-तरुणी, बालक, महिला तासरच वृद्धमंडळींचा दौडीत उत्स्फुर्त सहभाग होता. भगवे फेटे, भगवे ध्वज व पताका या मुळे परिसर भगवेमय बनला होता.
शिवकालीन पेहरावात दौडी च्या स्वागत साठी उभे असलेले बालचमू चौका चौकात उभारलेले शिवपुतळे सर्वांचा उत्साह वाढवत होता.
मंगाई मंदिर येथे रमेश परदेशी, संदीप हुंदरे, परशराम घाडी कुमार गडकरी, रवी पाटील यांच्या हस्ते मंगाई देवीची आरती करून सांगता करण्यात आली.
एस एम खन्नूकर 5001, शरयू युवराज पाटील 3200, सार्व श्री गणेशोत्सव मंडळ सोनार गल्ली 11111, शुभम रोहन पांचाळ 1001, मनोहर ठाणू कंगराळकर 1111, रमेश परदेशी 5001, संदीप कृष्ण हुंदरे 11111, परशराम घडी 11111, गंगाधर मचिकर 5555, उपमहापौर मुधुश्री पुजारी 5000 यांनी सुवर्ण सिंहासन साठी देणगी दिली.
उद्याची दौड…
सोमनाथ मंदिर ताशीलदार गल्ली ते श्री शनी मंदिर