बेळगाव शहरात सध्या ट्राफिक मॅनेजमेंटच्या माध्यमातून विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र यापासून बचावण्याच्या शकला करणाऱ्यांना आता आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. वाहन दुसर्यांना देणे किती महागात पडतंय हे दिसून येत आहे.
ट्राफिक मॅनेजमेंट च्या माध्यमातून सुरू असलेल्या दंड भरण्याच्या ठिकाणीही बराच गोंधळ उडतो आहे. एक महिला नोटीस मिळाली म्हणून १०० रुपये दंड भरण्यासाठी ट्राफिक मॅनेजमेंट केंद्रात गेली होती. तीने आपल्याला मिळालेली नोटीस पोलीस अधिकारी यांच्याकडे देऊन आपला 100 रुपये दंड भरून घेण्याचे सांगितले. मात्र त्यांच्या वाहनाचा क्रमांक संगणकात मारताच त्यांनी नियमांचे सुमारे १२ वेळा उल्लंघन केल्याचे दिसून आले.
यावेळी पोलीसानी जर सर्व दंड भरतो म्हटला तर मी तुमची रिसीट फाडु शकतो असे सांगितले. यावर महिला म्हणाली १०० रुपये भरण्यासाठी आलो आणि १२०० रुपये भरावे लागले. त्यानंतर त्या महिलेला समजले की आपले वाहन दुसऱ्याला देणे किती महागात पडू शकते.
त्यांतर त्या महिलेने १२०० रुपये दंड भरून आपली रिसीट घेतली व यापुढे आपले वाहन कुणालाच देणार नाही, असा खडा कानाला लावून घेतल्याचेच दिसून आले. यापुढे वाहन कोणालाही देताना त्यांचा वाहन परवाना आहे का? हे तपासणे गरजेचे असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.