नवरात्री उत्सवात निघणाऱ्या दुर्गामाता दौड मध्ये सर्वात मोठी दौड मानली जाणारी दौड म्हणजे शहापूर ची दौड होय.या भागात जवळ जवळ 15 किलोमीटर ची ही दौड असते दर वर्षी ह्या दौडी मध्ये सहभागी होणाऱ्या शिवप्रेमींची उपस्थिती लक्षणीय असते दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही शिवप्रेमींचा सहभाग अभूतपूर्व होता.
दौडीच्या अग्रभागी परम पवित्र भगवा ध्वज त्या नंतर शस्त्र पतक मग फेटे धारी ध्वज रक्षक पतक मग महिला व तरुणी त्या मागे बाळगोपाळ शेवटी तरुण कार्यकर्ते अस दौडीचे स्वरूप असते.शहापुरात देखील अत्यंत शिस्तीने ही दौड आयोजित केली जाते अशातच महिलांनी काढलेल्या रांगोळ्या, शिवप्रेमींन वर होणारी पुष्प वृष्टी, दारोदारी होणारे स्वागत यामुळे वातावरण उत्साही बनलेले होते. शहापूर आंबामाता मंदिर येथून दौडीस प्रारंभ करण्यात आला डी सी पी सीमा लाटकर ,डॉ सोनाली सरनोबत, नगरसेविका सुधा भातकांडे, यांच्या हस्ते आरती करून ध्वज चढवण्यात आला प्रेरणा मंत्र सांगून दौडीस सुरवात करण्यात आली या वेळी नेताजी जाधव, रवी साळुंखे उपस्थित होते.
शहापूर ,खासबाग, आनंदवाडी आदी भागात जाऊन ही दौड बसवेश्वर चौक गोवावेस येथे पोहोचली डी सि पी सीमा लाटकर, नगरसेवक पंढरी परब सुभोद गावडे यांच्या हस्ते आरती करून ध्वज उतरवण्यात आला.
महेश शटुप्पा कुंडेकर व परिवार यांच्या कडून 5001,नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या कडून 5001,
तर महागणपती युवक मंडळ यांच्या कडून डॉल्बी आणि फटाक्यांना फाटा देत सुवर्ण सिंहासन साठी 5101 चा धनादेश श्री शिवप्रतिष्ठान च्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आला.
उद्या ची दौड
शिवतीर्थ( मिल्ट्री महादेव ) ते मारुती मंदिर संयुक्त महाराष्ट्र चौक