२५ ते ३० सप्टेंबर या काळात बेळगावचे नगरसेवक सिमला दौऱ्यावर गेले होते.त्यांनी आपल्या खर्चाचे बिल मनपाकडे दिले आहे. अभ्यास दौरा या माध्यमातून झालेल्या या टूर चा खर्च १४.४० लाख इतका झाला आहे. हा खर्च मनपाला नागरिकांच्या निधीतूनच द्यावा लागणार आहे.
मनपा अकाउंट विभागाने अजून हे बिल मंजूर केले नाही. मनपा बैठकीत चर्चा होऊन त्याला मंजुरी मिळू शकते.
४६ नगरसेवक या टूरला जाणार होते पण प्रत्यक्षात ४० जण गेले होते. बिल वाढवून दिले जाणार अशी शक्यताही होती आता ते वाढवून दिले आहे की काय हे स्पष्ट नाही.
हे ४० नगरसेवक व्हीआरएल बसने बेळगाव ते मुंबईला गेले होते. तिथून विमानाने चंदीगड ला व सिमला पर्यंत बस चा प्रवास केला होता. पुन्हा येताना चंदीगड पर्यंत बस, तिथून विमान व मुंबईहून परत बस असा प्रवास झाला होता. नगरसेवकांचे वाद,आपापसातील धुसफुस, फोटो काढण्या वरून दारू नशेत मारहाण झाल्याने दौरा गाजला होता आता याचे बिल 14.4 लाख झाले आहे.