आगामी खासदार निवडणूक, बेळगाव मनपा निवडणूक आणि तालुका, जिल्हा व ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व माहिती, मतदार याद्या, मतपत्रिका तसेच निवडणूक कार्यक्रम सीमाभागातील मराठी मतदारांना मराठीतून देण्यात यावे. अशी मागणी मद्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली.
अध्यक्ष दीपक दळवी यांनी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला याबद्दल निवेदन पाठवले आहे. मराठी मतदारांना निवडणुकीची माहिती मराठीतून मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मराठी उमेदवाराला निवडणूक अर्जही मराठीत मिळायला पाहिजे. याची पूर्तता करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
काल मध्यवर्ती च्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेऊन निवेदन पाठवण्यात आले.