गणेशपुर हा भाग कचऱ्याचा गाव म्हणून प्रसिद्ध होत आहे. या भागातील कचऱ्याची मागील २ वर्षांपासून उचल होत नाही. यामुळे सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
कोणत्याही भागात ४ दिवसांपेक्षा जास्त कचरा साचला तर दुर्गंन्ध सुटतो पण या भागात तर वर्ष दोन वर्षे कचरा उचलला जात नसल्याने वाईट स्थिती निर्माण होत आहे.
या कचऱ्याकडे प्रशासन वेळेत लक्ष देईल का? येथील नागरिकांचे आरोग्य रोगराईत अडकू नये म्हणून काळजी घेईल का? स्वच्छता करणाऱ्या संस्था आपला झाडू कधीतरी या भागात फिरवतील काय? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांतुन गणेशपुर कचरा मुक्त होण्यासाठी उत्तर अपेक्षित असून ते लवकर मिळावे अशी गरज आहे.