सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ भांदूर गल्ली बेळगाव यांनी नवरात्री निमित्त महालक्ष्मी देवीला विविध प्रकारे सजविण्याचा प्रघात कायम ठेवला असून आज देवी कमळ फुलावर विराजमान झाली आहे.
या नऊ दिवशी परिसरातील भाविक देवीच्या दर्शन निमित्ताने आवर्जून हि सजावट पाहण्यास भांदूर गल्लीस मोठ्या प्रमाणात भेट देतात. मूर्तिकार श्री विनायक पाटील ही जबाबदारी अत्यंत भक्तिभावाने निभावतात.
या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून या महालक्ष्मी देवीचा लौकिक आहे.
हे मंदिर ब्रिटिशकालीन असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दिवंगत बाळूमामा (निंगाप्पा) उचंगावकर यांच्याकडे मंदिराची पूजाअर्चा करण्याचा मान होता. आतादेखील त्यांच्या कुटुंबीया सोबत मंदिर परिसरातील युवराज मलकाचे,रोहन जाधव, सिद्धार्थ भातकांडे, विजय होनगेकर, विनायक जाधव, विनायक पाटील हे भाविक मंदिरासाठी होणाऱ्या विविध कार्यक्रमात आपल्या कुटुंबियांसोबत हातभार लावत असतात.
दसऱ्या निमित्त इथं एक मोठा पालखी सोहळा आयोजित केला जातो. त्याचसोबत दर पाच वर्षांनी श्री महालक्ष्मी मंदिर वाढदिवसा निमित्त महाप्रसाद आयोजित केला जातो.भांदूर गल्लीतील महालक्ष्मीचा आशीर्वाद ज्याच्या सोबत तो बेळगावातील राजकारणात नक्की यशस्वी होतो अशी एक गोष्ट इथं नेहमी गमतीने म्हंटली जाते.