मांगल्य आणि चैतन्य देणारी देवी म्हणून किल्ला येथील श्री दुर्गादेवीची ख्याती आहे ही देवी अनेकांचे श्रद्धास्थान असून दर मंगळवार आणि शुक्रवारी या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असतेच असते. सध्या शारदीय नवरात्रोसवाला घटस्थापनेपासून सुरुवात झाली आहे.या मंदिराची उभारणी 1260 च्या दशकात झाली आहे. तेंव्हापासून आजतागत या मंदिराचा महिमा अपरंपार आहे. हे मंदिर सध्या लष्करी अखत्यारीत येते. मात्र अनेकांचे आराध्य दैवत असल्याने येथे भाविकांची गर्दीही कायमचीच.
भकताना देवीप्रति निष्ठा असल्याने नवरात्री आणि श्रावण महिन्यातही येथे विधिवत पूजा अरच्या करण्यात येते.लष्करी जागेत असणाऱ्या या दुर्गादेवीचा महिमा काही वेगळाच आहे. अनेक भाविक येथे मोठया श्रद्धा आणि निष्ठेने येते आपली मागणी मांडता व ती मान्यही होते, अशी ख्याती आहे. त्यामुळे या देवीला अणे भक्तांना यावेसे वाटत असते.
नवरात्रीत 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. विविध स्वरूपात देवीची आरास बांधण्यात येते. या देवीला लिंबुचे दुवे लावले जातात. भक्त आपल्या मागणीनुसार ते दिवे लावतात. त्यामुळे या देवीचा महिमा काही न्यारा वेगळाच आहे. वर्षभर या मंदिरात बारा महिने देवीची विधिवत पूजा आणि कार्यक्रम राबविले जातात.
मंदिरात दुर्गा देवीच्या मूर्तीसह अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. त्यांचीही विधिवत पूजा केली जाते. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारी देवी म्हणून या देवीचा महिमा आजही तसाच आहे महिलां मध्ये ही देवी जास्त देवी पावत असते.