ए1 एच1म्हणजे स्वाइन फ्लू:या स्वाईन फ्लू ने बेळगाव जिल्हात थैमान घातले असून स्वाइन फ्लूची बेळगावमध्ये 15 जणांना लागण झाली आहे.
H1N1 च्या फैलावामुळं बेळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी आप्पासाहेब नरहट्टी यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील बेळगाव, रायबाग तसेच इतर तालुक्याममध्ये हे विषाणू आढळले आहेत.त्यांची तपासणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
थंडी, ताप तसेच पोटदुखी होत असेल तर नागरिकांनी लवकर उपचार घेणे गरजेचे आहे.