सर्वपित्री अमावस्या असल्याने आज सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे नेहमी गजबजून जाणाऱ्या आवारात आज शुकशुकाट आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायत विभागात नेहमी गर्दी असते. रोज सकाळी ११ पासून लोक निवेदन आणि आंदोलन करण्यासाठी येत असतात. पण आज सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असूनही संपूर्ण वातावरण शांत आहे.
या अमावस्येला कडक मानले जाते. म्हाळ महिना संपताना या अमावस्येला सर्व पितरांचे स्मरण करून पूजन करतात. यासाठी आज सरकारी सुट्टी देण्यात आली आहे. महालय आमावस्या असेही म्हटले जाते.
कर्नाटकात सर्व पित्री अमावस्येला कोर्टाची देखील सुट्टी असते त्यामुळं नेहमी गजबजत असलेला कोर्ट परिसरात देखील शुकशुकाट पहायला मिळत आहे.
आजच्या अडलेल्या कामांचा ताण मात्र उद्या दिसून येणार असून उद्या कामासाठी येणारे नागरिक वाढणार आहेत.