रहदारीचा ताण कमी करण्यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांनी गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली आणि रिसालदार गल्लीत वन वे नियम अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
नार्वेकर गल्लीत नागरिक समादेवी गल्लीतून वर जाऊन नार्वेकर गल्ली व रिसालदार गल्लीत जाऊ शकतील पण परत समादेवी गल्ली किंव्हा खडेबाजारला येऊ शकणार नाहीत.
रिसालदार गल्लीतून खडेबाजार पोलीस स्थानक पासून पुढे लोक शनिवार खुट ला जाऊ शकतील पण शनिवार खुट वरून परत येऊ शकणार नाहीत. या गल्लीत सम आणि विषम तारखावरून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फक्त मोटार सायकल पार्क करता येतील.
गोंधळी गल्लीत लोक समादेवी गल्ली कॉर्नर पासून व्हेटरिनरी हॉस्पिटल पर्यंत प्रवास करू शकतील मात्र परत समादेवी गल्ली कॉर्नर पर्यंत येऊ शकणार नाहीत.