तालुक्यातील कडोली गावामधे प्रमुख रसत्याचे रुंदीकरण करण्याचा घाट घालण्यात आला होता. या मास्टर प्लॅन वाढत विरोध पाहून ग्रामस्थांची बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत चांगलाच गोंधळ माजला आहे. त्यामुळे मास्टर प्लॅनचा घाट घालणाऱ्यांची पंचायत झाली.
या रस्त्याबाबत शुक्रवारी ग्राम पंचायत व बांधकाम खात्याचा वतिने नागरिकांचा मत जाणण्यासाठी बैठक घेण्यात आली. ही सभा वादळी ठरली. नागरिकांचा मते न जाणुन घेता रस्ता रुंदिकरण व सुशोभिकरणचा निर्णय घेतलेल्या ग्राम पंचायत व बांधकाम खात्याचा अधिकाऱ्यांनी नागरीकांनी तीव्र विरोध करून धारेवर धरले. यावेऴी अधिकारी, नेते व नागरिकामध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली.
जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, तालुका पंचायत सदस्य उदय सिद्दन्नवर, ग्राम पंचायत अध्यक्ष राजु मायान्ना, बांधकाम खात्याचे अधीकारी मठपती, कुलकर्णी व नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना अधिकारी म्हणाले की ग्राम पंचायतीच्या शिफारशिनुसार कडोली मधील प्रमुख रस्त्याचे रुंदिकरण करण्याचा ठरविण्यात येत आहे. जर रुंदिकरणामध्ये घरे पाडली गेली तर, कोणतीही नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव नसल्याचे सांगण्यात आले. जर पेठेतील नागरिकांची तक्रार नसेल तरच रस्ता करण्यात येइल असे सांगितले. मात्र याला नागरिकांचा विरोध असल्याचे दिसून आले.
यावेळी बोलताना जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे प्रमुख रस्ता रुंदिकरण ही काळाचे गरज असुन हे काम अामदारांच्या पुढाकाराने होत असुन, ज्यांचे घर जात आहे त्याना ग्राम पंचायतमार्फत आश्रय योजनेमधुन घरे मंजुर करुन देन्याचा ग्वाही दिली. मात्र याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे त्याची पंचायत झाली.
तालुक पंचायत सदस्य उदय सिद्दन्नवर म्हणाले कि रस्ता रुंदिकरनाला आपला विरोध नसुन पण काम हाती घेण्याआधी ज्याचे घरे जातिल त्याना योग्य नुकसान भरपाइ देन्याबाबत निर्णय घ्यावा. प्रत्येक घराचे नुकसान बाबात सर्वेक्षण करावे व योग्य भरपाइ साठी पाठपुरावा करावा असे सांगितले. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी चक्कार शब्दही काढला नाही. त्यामुळे याला विरोध होत होता.
रस्ता काम हाती घेण्याअाधी, नागरिकांना न कळविल्याबद्दल अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. रस्ता ग्राम संपर्क रस्ता असताना राज्य महामार्ग असल्याचा सांगुन दिशाभुल करत असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारला. गावामधे ये जा करण्यास कोणतेही समस्या नसताना रस्ता रुंदिकरण करण्यात येत असुन, या कामा आधी शेतातील रस्ते विकास करावे असे ठणकावून सांगण्यात आले.
अखेर अधिकारी वर्ग ग्रामस्थाचा विरोध असेल तर रस्ता रुंदिकरण विषय सोडण्यात येइल असे सांगितले. त्यामुळे या प्रकरांवर पडदा टाकण्याचे काम झाल्याचे दिसून आले.