मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस जेडीएस युती सरकार आपले हिवाळी अधिवेशन बेळगावला घेणार आहे. कुमारस्वामी यांनीच पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर बेळगावमध्ये अधिवेशन घेण्याचा घाट घातला होता. यंदा ते दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री म्हणून हे अधिवेशन घेतील.
सलग १८ दिवस अधिवेशन घेतले जाणार असून ते नोव्हेबर की डिसेंबर याची तारीख ठरलेली नाही. बेळगाव येथे बांधण्यात आलेल्या सुवर्ण विधान सौध मध्ये ते अधिवेशन होणार आहे.
कुमारस्वामी यांनी ही प्रथा सुरू केली तेंव्हा के एल ई संस्थेच्या जागेत हे अधिवेशन झाले होते. त्यानंतर जागेची निवड करून सुवर्ण विधान सौद हलगा येथे बांधण्यात आले.
वर्षातून एकदा सरकारी जत्रा आणि मंत्री आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या आंदोलनांनी बेळगावच्या रहदारीवर ताण हेच आजवर अधिवेशनात बघायला मिळाले, यावेळी कुमारस्वामी वेगळं काय करतात हे बघावं लागेल.