राणी चन्नम्मा विद्यापीठाचे सिंडीकेट सदस्य राजू चिकनगौडर याचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी मानव बंधुत्व वेदिका आणि विविध दलित संघटनांनी केली आहे. चिकनगौडर हे आर सी यु चे भगवेकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप करत विद्यापीठात झालेल्या अनेक गैर व्यवहारात ते सामील आहेत त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करा असे निवेदनात म्हटलं आहे.
शुक्रवारी कित्तूर चन्नमा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून निदर्शन करण्यात आली दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी टायरला आग लाऊन निदर्शन करत घोषणाबाजी केली.आर सी यु मध्ये कर्मचारी भरती,लॅपटॉप खरेदी,विद्यार्थी वेतन आदी प्रकरणात प्रचंड घोटाळा झाला असून यात चिकनगौडर यांचा सहभाग आहे त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करा अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात रवी नायकर,मारुती कुंदी यांच्यासह अनेक दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोण आहेत हे राजू चिकनगौडर?
राणी चन्नमा विद्यापीठात नोकर भरती इतर कामात भ्रष्टाचाराचा आरोप झालेले राजू चिकनगौडर कोण आहेत जाणून घेऊयात..
मूळगाव नेसरगी (ता.बैलहोंगल).. राज्य भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, खासदार सुरेश अंगडी यांचे निकटवर्तीय…आर सी यु चे सिंडीकेट सदस्य…
‘मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार’- चिकनगौडर
दलित संघटना पेक्षा अगोदर राजू चिकनगौडर यांच्या वर माजी मंत्री आमदार सतीश जारकीहोळी यांनी देखील सिंडीकेट सदस्य म्हणून नेक भ्रष्टाचार केल्याच आरोप केला होता त्या नंतर त्यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप खोडले होते.इतर सिंडीकेट सदस्या प्रमाणे आपणही एक सदस्य असून सर्व प्रकरणात कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत असे स्पष्ट केलंय