वीज वितरण कंपन्यांनी जेव्हा पासून वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे तेंव्हा पासून सर्वत्रच वीजबिल ऑनलाईन भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे मात्र बेळगावात याला आधी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. लोक सोशल मीडियावर ऑनलाईन राहतात मात्र वीज बिल भरण्यात मागेच आहेत त्यामुळे ही प्रक्रिया वाढविण्यासाठी जागृतीची गरज निर्माण झाली आहे.
सध्या बेळगावात अनेक वीज ग्राहक आहेत. यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र ऑनलाइन वीजबिल भरण्यासाठी अनेकांची नापसंदी आहे. याचा गंभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी हेस्कॉमने पुढाकार घेऊन याबाबत जागृती केल्यास अनेकजण ऑनलाइन वीजबिल भरण्याकडे वाळू शकतील. असही जाणकारांचे म्हणणे आहे.
मागील काही वर्षांपूर्वी वीजबिल भरण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागत होते. त्यामुळेच आता कोणत्याही जागेवरून कोठेही वीजबिल भरण्याची तरतुद ऑनलाईन द्वारे करण्यात आली आहे. मात्र बेळगावातील अनेक जण याकडे दुर्लक्ष करून संबंधित केंद्रावर वीज भरण्यासाठी जाण्याची मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
बेळगावात सध्या 5 लाखाहून अधिक ग्राहक आहेत. तर ग्रामीण भागात ग्राम पंचायत अथवा इतर ठिकाणी केंद्रे स्थापन करून वीजबिल घेण्यात येते. त्यामुळे अनेकांना ऑनलाईन भरण्याची प्रक्रियाच माहिती नाही. त्यामुळे अजून ही रांगा दिसतातच. या रांगा कमी करण्यासाठी ऑनलाइन वीजबिल भरमा आज काळाची गरज बनली आहे.