बेळगाव शहरात आज दुपारपासून पाऊस आहे. पण तितक्याच प्रमाणात उकाडाही आहे. सध्या शहराचे तापमान ३१ डिग्री वर गेले असून परिस्थिती पावसात उकाडा अशी आहे.
शहराचे कालचे तापमान २७ डिग्री इतके होते. आज त्यात ५ डिग्रीने वाढ झाली आहे. पाऊस येऊन वातावरण थंड होण्यापेक्षा ते जास्त गरम होत आहे, त्यामुळे फॅन शिवाय बसता येत नाही अशी अवस्था आहे.
साधारणपणे बेळगावच्या तापमानात दरवर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर वाढ होते पण यंदा सप्टेंबर मध्येच उष्णता वाढली आहे.
जे काही तापमान वाढत आहे त्यामुळे पाऊस पडूनही काहीच फरक पडत नाही अशी अवस्था आहे. पावसाळा संपला तर मात्र यंदा ऑक्टोबर मध्येच तापमान जास्त वाढणार असून नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागेल.
हवामान तज्ञांच्या मते यंदा अति उकाड्याचा त्रास सगळीकडे सहन करावा लागणार आहे. बाहेर फिरताना पाऊस आणि थंडी आणि घरी आल्यावर फॅन शिवाय बसता येत नाही असे वातावरण असून यामुळे नागरिक जास्त आजारी पडत आहेत.