बेळगाव ग्रामीण च्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मागे जोरदार शुक्लकाष्ठ लागले आहे. त्यांचा हटाव काँग्रेस महिला विंगच्या अध्यक्षपदावरून करा आणि त्यांच्याजागी नागलक्ष्मी चौधरी यांना अध्यक्ष करा अशा मागणीसाठी बेंगळुरूत आंदोलन करण्यात आले आहे.
हेब्बाळकर या आमदार आहेत, त्यांना एक पद मिळालेले आहे. ज्याप्रमाणे केपीसीसी अध्यक्ष दिनेश गुंडूराव यांना मंत्री होता येत नाही तसेच नियम हेब्बाळकर यांच्या बाबतही लावा आणि त्यांना अध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस महिला विंग च्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
जारकीहोळी ब्रदर्स शी वाद वाढल्यानंतर लक्ष्मी आक्का यांचे महिला विंग अध्यक्षपदही धोक्यात आले असून या आंदोलनामागे कोण आहे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
आता आक्का काय निर्णय घेतात आणि पक्षाचे प्रमुख त्यांना कोणता निर्णय देतात यावर पुढील राजकारण ठरणार आहे.