हेस्कॉम काकती फिडर मधून वारंवार होत असलेल्या भारनियमनामुळे बेळगाव उत्तर विभागातील उद्योजक त्रासले आहेत. याविरुद्ध नॉर्थ बेळगाव इंडस्ट्री असोसिएशन च्या वतीने आज हेस्कोमला निवेदन देण्यात आले.
हेस्कोम चे एक्सिकुटीव इंजिनिअर प्रवीण चिक्काडे यांना निवेदन देऊन या भारनियमनाचा विरोध करण्यात आला. पूर्व सूचना न देता वीज काढण्यात येते . प्रत्येक रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत वीज नसते. व्होल्टेज ची समस्या होते यामुळे उद्योगात तोटा होत आहे.
लेखी उत्तर आणि कारण द्या नाहीतर इथेच ठाण मांडू असा इशारा देण्यात आला. लवकरात लवकर वीज समस्या न सुटल्यास धरणे आंदोलन करू असाही इशारा दिला आहे.
अध्यक्ष एन जे शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली काकती, होनगा, उक्कड या भागातील उद्योजक जमले होते.