सर्वात जास्त प्लास्टिकचा कचरा होतो तो चहाच्या गाड्यावर. चहा पिला की लोक प्लास्टिकचे कप फेकून देतात आणि कचऱ्याची वाढ होते. यासाठी महिलांनी गांधीगिरीचा मार्ग निवडला. चहा गाडी वाल्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांना स्टीलचे कप भेट देण्यात आले. कप लागले तर सांगा आम्ही आणून देऊ पण कचरा होऊ देऊ नका असे आवाहन या महिलांनी केले.
नवझुंजार महिला मंडळ अध्यक्षा शिल्पा केकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. मंडळाच्या उपाध्यक्ष जयश्री हणमशेट ,मंडळ सदस्य शीतल कुडतुरकर ,स्वाती रानडे – भारती नाकाडी, पूनम बैलूर प्रियंका गावकर या सहभागी झाल्या होत्या.
नार्वेकर गल्ली, समादेवी गल्ली,काकतीवेस, खडेबाजार, केळकर बाग येथील चहावाल्यांना स्टीलचे कप वाटण्यात आले. एकूण
आठ चहागाडीवाल्यांना प्लास्टिक चे कप वापरू नका पर्यावरण प्रदूषण करू नका अशी शिकवण या महिलांनी दिली आहे.
प्लास्टिक च्या अति वापरणे अनेक त्रास मानवाला भोगावे लागत आहेत अश्यात नेमकं गांधीं जयंतीच्या निमित्ताने का होईना पर्यावरण प्रदूषण जण जागृतीचा संदेश या महिलांनी दिलाय हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
छोट्या छोट्या गोष्टीतून कचरा होतो. तो साफ करणे अवघड जाते त्यामुळे कचराच होऊ नव्हे यासाठी हा उपक्रम राबवत आहे असे अशी माहिती अध्यक्षा शिल्पा केकरे यांनी दिली आहे.