शाळा सुट्टी असल्याने मित्रा सोबत पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यु झाल्याची घटना बेळगाव जवळील गौन्डवाड येथे घडली आहे.
गौतम लक्ष्मण पवार वय 14 रा. गौन्डवाड असे बुडून मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गांधी जयंती निमित्य शाळेला सुट्टी होती म्हणून गौतम हा त्यांच्या गावातील
भरम तलावात पोहायला गेला होता त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.
गौतम हा आपल्या आई वडिलांना एकुलता होता आणि दत्तक म्हणून आला होता अशी देखील माहिती मिळाली आहे.बुडालेली घटना माहीत होताच ग्रामस्थां कडून शव बाहेर काढण्यात आले काकती पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.