तालुका पंचायत सदस्य महांतेश अलाबादी यांनी तालुका पंचायत कार्यालयात आपला दणका पुन्हा एकदा दाखवून दिला. मात्र अध्यक्ष शंकर पाटील यांनी त्याकडे कानाडोळा करत आपल्या मनमानी कारभाराचा कित्ता गिरवला. त्यामुळे साऱ्याच तालुका पंचायत सदस्यातून नाराजी व्यक्त करण्यात आली.
पीएलडी बँकेचे राजकारण आता तालुका पंचायत फंड वाटपातून दिसून आले .अलाबादी यांनी आपल्याला स्टॅम्प ड्युटी अनुदानातून वगळण्यात आले आहे याचे कारण अलाबादी यांनी भर सभागृह मध्ये विचारले यावेळे अध्यक्ष यांनी तुम्ही तुमचा आराखडा वेळेवर दिला नसल्याचा आव आणत त्यांचा निधी स्वतःच्या कार्यक्षेत्रात वळविण्यात आल्याचा सोपा मार्ग अध्यक्ष यांनी सांगितला. त्यामुळे अलाबादी यांनी अध्यक्ष यांना चांगलेच धारेवर धरले.
अलाबादी यांनी मी तुमचा विरोध करत असल्यामुळे आणि पीएलडी बॅंकेत तुमच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना विरोध केला म्हणून तुम्ही मला या निधीपासून दूर ठेवलात असा आरोप यावेळी करण्यात आला. यावर अध्यक्ष यांनी मला आमदार यांनी सांगितले नाही असे म्हटले आहे मात्र अलाबादी यांनी मला निधी देऊ नका असा दबाव हेब्बाळकर यांचे भाऊ चननराज यांनी अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांवर आणला असा आरोप बेळगाव live कडे बोलताना केला .
यावर केवळ तुम्हालाच जनतेने निवडून दिले नाही तर आम्हालाही जनतेनेच निवडून दिले आहे. आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जर निधीच नसेल तर या पदाचा काय फायदा? असा सवाल त्यांनी सभागृहात मांडला. यावेळी अध्यक्ष यांनी वेळ मारुन नेत राष्ट्रगीत लावून सभेची सांगता केली. त्यामुळे अध्यक्ष यांनी सभा गुंडाळत याला बगल दिल्याचेच दिसून आले.
एकूणच बेळगाव तालुका पंचायतीत देखील पी एल डी बँकेचे राजकारणाचे पडसाद उमटत असल्याचा दिसत आहे.