विधान सभा निवडणुकीच्या चार महिन्यातच पुन्हा एकदा संजय पाटील विरुद्ध लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात वाकयुद्ध सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस सोडून भाजपात येण्यासाठी भाजपकडून मला 30 कोटींची ऑफर होती या हेब्बाळकरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार माजी आमदार संजय पाटील यांनी घेतला आहे.
खोटं बोलणे आणि घमेंडीचे कॉम्बिनेशन म्हणजे लक्ष्मी हेब्बाळकर अशी बोचरी टीका त्यानी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर केली आहे.रविवारी बेळगावात ते पत्रकारांशी बोलत होते.
हेब्बाळकर यांना 30 कोटी देण्या एवढे भाजपला वाईट दिवस आले नाहीत असं असेल पैश्याचे ऑफर दिलेल्याचे नाव जाहीर करावं असे प्रति आवाहन देत लक्ष्मी या काँग्रेसशी नव्हे तर डी के शिवकुमार यांच्याशी लॉयल आहेत असा देखील टोला लगावला आहे.
एम एल सी निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी त्यानी पैसे वाटलेत असा आरोप करून त्यांनी त्याना काँग्रेस निष्ठावंत म्हणणे चुकीचे आहे असं देखील म्हटलंय.
खोटे बोलणं बंद करा तुम्ही खोटं बोलूनच निवडून आलाय ,मागील निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांनी मदत केली मात्र ते विसरून त्या डी के शिवकुमाराच्या गटात सामिल झालेत त्याचं ऐकूनच रमेश जारकीहोळी यांच्या विरुद्ध मोहीम उघडली आहे असा देखील त्यांनी आरोप केलाय.
वरील आरोप करत संजय पाटील यांनी जारकीहोळी बंधू विरुद्ध लक्ष्मी या वादात उडी घेतल्याचं बोललं जातं आहे विधान सभा निवडणुकीच्या पराभवा नंतर संजय पाटील या आरोप नंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेत आता लक्ष्मी काय पलटवार करणार याकडे लक्ष लागून राहील आहे.