कडोली येथे बड्या नेत्याकडून मास्टर प्लॅनचा अट्टाहास सुरू करण्यात आल्यामुळे अनेकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहता केवळ गावातूनच हा रस्ता करण्यात येत असल्याने याला विरोध वाढत आहे. त्यामुळे एका आमदारांच्या पीए कडून विरोध करणाऱ्यांना धमकी दिली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
कडोली येथून जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्ग नाही. केवळ राष्ट्रीय महामार्गला जुळला असल्याने याचे रुंदीकरण कशासाठी? आणि हा रस्ता केवळ ८०० मीटर होणार आहे. त्यामुळे फक्त गावमर्यादीतच हा रस्ता करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ गावातच का हा रस्ता करण्यात येत आहे? या मागचे गौडबंगाल काय? असा सवालही निर्माण झाला आहे.
हा रस्ता करायचा असल्यास एपीएमसी ते बेन्नाळी क्रॉस पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्यासाठी धडपड करावी, अशी मागणी होत आहे. मात्र केवळ गावपूरताच हा रस्ता करण्यात येत असल्याने याला विरोध वाढत आहे. परिणामी ज्यांनी याला विरोध सुरू केला आहे त्या व्यक्तीला वैयक्तिक बोलावून धमकी देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कडोली गावातून केवळ ८०० मीटर रस्ता करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधीने संबंधित ग्राम पंचायत यांना नोटिसा पाठवून देखील त्यानी अनेकांना याची माहिती दिली नाही. त्यामुळे हा विरोध अधिक वाढला आहे.
त्यामुळे हा रस्ता करण्यात त्यांचाही हात अधिक असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात अनेकानी याला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीला निवेदनही दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे हा रस्ता रुंदीकरण करू नये, अशी मागणी होत आहे.