ज्या योजनेच्या यशस्वीते मुळे नगरसेवक सिमला इथे प्रशिक्षण घेण्यास गेले आहेत त्याच २४ तास पाणी योजनेचा सदाशिवनगर भागात बोजवारा उडाला आहे. या भागात २४ तास पाणी येणे बंद झाल्यामुळे नागरिकांना विहिरी, कूपनलिका आणि टँकर वर अवलंबून राहावे लागत आहे.
मागील काही दिवसांपासून सदाशिवनगर येथे २४ तास पाणी येणे बंद झाले आहे. पाईपलाईन मधील बिघाड व इतर कारणे सांगून दररोज नव्हे तर सदाशिवनगर च्या काही भागात चार ते पाच दिवसातून एकदा पाणी सोडण्यात येत आहे. अशी माहिती बेळगाव live कडे मिळाली आहे.
सध्या नगरसेवकांचा दौरा गाजत आहे. सिमलाचे नगरसेवक बेळगाव येथील २४ तास पाणी योजनेची पहाणी करून बेळगावातील नगरसेवकांना सिमला येथे येण्यास आमंत्रण देऊन गेले होते तीच योजना सदाशिवनगर परिसरात गेले तीन दिवस झाले बंद आहे.बेळगावचे मुख्य उपनगर असलेल्या सदाशिवनगर मध्ये २४ तास पाणी येणे बंद झाले आहे याकडे यापैकी कुठलेच नगरसेवक आणि मनपाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. अजूनही परतीच्या पावसाचा जोरदार मारा सुरू आहे त्यामुळे जलस्त्रोत भरलेले आहेत तरीही सप्टेंबर महिन्यातच हे पाणी २४ तास येणे बंद झाल्यामुळे नागरिकांची पायपीट वाढली आहे. नागरिकांना आत्तापासूनच पाण्यासाठी खिशातले पैसे खर्च करावे लागत आहेत.